Challenging tomorrow morning | rutu says
उद्याची सकाळ ...! आयुष्य खूप छोटं आहे आणि या छोट्या आयुष्यामध्ये आपल्याला खूप काही करायचं असत . प्रत्येक दिवशी आपण ठरवतो मला आज हे करायचंय, उद्या हे करायचंय, काल असं केलं होत पण परत छान करायचंय . म्हणजेच आपण रोज आपल्याला नवीन आव्हान करत असतो . पण आपण ठरवलेलं प्रत्येक काम आज नाही झालं तर आपण उद्यावर ढकलतो . अस का बर ??? आज माझी मैत्रीण भेटली खूप दिवसातून . विचारपूस झाली, मग मूळ मुद्यावर आली मला म्हणाली ऋतु मला हे घेयचय ,असं करायचंय, तिकडे जायचंय ,सगळ्यांना भेटायचंय, हे आणायचंय पण काय करू वेळच मिळत नाही . सगळा दिवस कामात जातो . खूप काही नवीन ठरवते ग पण वेळ मिळतच नाही ... काय असं वाटतंय ना हे आपल्या सोबत पण घडतंय ??? कामाची ओढाताण ,प्रत्येक दिवसाची नवीन आव्हान , प्रत्येकाचे विचार , आणि या सगळ्यामध्ये आपण आपले ठरवलेले नवीन काम, कि जे वेळ मिळत नाही म्हणून पूर्ण होतच नाही . आणि मग आपण आपल्या आवडीची कामे नाही झाली म्हणून कारणे देऊ लागतो . आज इकडेच वेळ गेला ,आज ह्या कामामध्ये होते , कंटाळाच आलेला अशी बरेशची का...