Be Uniquely You Stand Out Shine Be Colorful | Rutu says
आपण आणि आपले रंगीन आयुष्य ..! वेगवेगळ्या रंगापासून बनवलेल्या वस्तू आणि गोष्टी किती रंगीन आणि आकर्षक वाटतात ना . डोळ्यांना अगदी मोहून टाकतात . मनाला हवेहवेसे वाटतात . आपल्या आयुष्याचं पण तसेच आहे . आयुष्यात वेगवेगळ्या प्रकारचे रंग हे वेगवेगळ्या प्रकारची माणसे आणतात . काही माणसे आपल्याला दाखवताना एक आणि ते स्वताः असतात एक म्हणजेच आपल्या बोली भाषेत रंग बदलणारी असतात जे कि कोणाला आपलेसे वाटत नाहीत . आणि काही माणसे माझ्या आवडत्या रंगाप्रमाणे असतात म्हणजेच काळ्या रंगाप्रमाणे जे कधी बदलत नाहीत . कोणताही रंग मिसळला तरी आपला रंग सोडत नाही . रंगवणारी माणसे भरपूर आहेत आपण ठरवायचे आपल्याला कोणत्या रंगात मिसळायचे . कि आपणच आपला रंग निर्माण करायचा ... मी वरवरच्या रंगांबद्दल नाही बोलते...