The Basis On The Turn Of Life...| Rutu says
आधार..!
आधार हा शब्द म्हणायला आणि बघायला किती सोप्पा आणि छोटा वाटतो ना ! पण जेव्हा परिस्थिती येते तेव्हा याच शब्दाची खरच खूप गरज असते . तेव्हा हा शब्द काही लोकांच्या आयुष्यात साथ देतो तर काही लोकांच्या आयुष्यात साथ देत नाही . प्रवास करताना गाडी मध्ये मिळालेला आधार आणि आयुष्याचा प्रवास करताना मिळालेला आधार हे दोन्ही आधार त्या त्या परिक्षितीच्या वळणावर महत्वाचे असतात . या दोन्ही आधारामध्ये फरक फ़क्त एवढाच कि प्रवासात गाडी मध्ये मिळालेला आधार हा क्षणभरासाठी असतो . पण आयुष्याच्या प्रवासात प्रत्येक वळणावर मिळालेला आधार हा आयुष्यभरासाठी असतो . हा आधार चांगल्या आणि वाईट अशा दोन्ही परिस्थिती निभावून न्हेतो .
आयुष्यात आपल्याला वेगेवेगळ्या परिस्थितींना सामोरे जावे लागते. कधी कधी परिस्थिती खूप मोठी आणि बिकट असते . पण त्या परिस्थितीमध्ये आपल्याला आपल्यापेक्षा लहान व्यक्तीचा आधार मिळतो . आणि त्या वेळेस ती व्यक्ती आपल्याला आपल्याहून मोठी वाटते . परिस्थिती आपल्याला वागायला बोलायला आणि परिस्थितीला सामोरे जायला शिकवते . तसेच त्याच परिस्थिती मध्ये आपल्याला हसून जगायला शिकवते . पण अशा परिस्थिती मध्ये माणसाला योग्य आधार मिळणे खूप गरजेचे असते . त्यावेळेस ती व्यक्तीं मिळालेल्या आधारासाठी आयुष्यभरासाठी ऋणी असते .
काय मग आपण झालोय का कोणी कोणाचा असा आधार ..!? कि त्यावेळेस त्या व्यक्तीसाठी आपण त्याच्या नजरेत खूप मोठे झालो आहोत !? त्यासाठी प्रत्येक व्यक्तीची परिस्थिती समजून घ्या. त्या त्या परिस्थिती मध्ये त्या व्यक्तीला बोलण्यातून आणि आपल्या वागण्यातून आधार द्या . हा मिळालेला आधार ती व्यक्ती काही क्षणासाठी आपल्यावर आलेली परिस्थिती विसरून जाईल . आणि त्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर एक हलकंसं स्मित हास्य येईल ते तुम्हाला कायम लक्षात राहील , आणि हा क्षण तुम्हाला तुमच्या आयुष्याला खुप सुंदर अनुभव देइल .
तुम्हाला माझा हा ब्लॉग आवडला असेल तर नक्की कंमेंट करा आणि इतरांपर्यंत याची लिंक पोहचवा
धन्यवाद ..!
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा