The first rain | Rain and Me | Rutu says
पावसाची पहिली सर .. पावसाची पहिली सर आपल्या आठवण करून देते त्या दिवसांची ज्या दिवशी आपण आनंदी किंवा दुखी असतो. पावसासोबतच्या प्रत्येकाच्या भरपूर आठवणी आहेत , पण सगळ्यात जवळची आठवण म्हणजे त्या पावसाच्या सरी आणि त्या पावसामध्ये भिजलेले आपण, त्या प्रत्येक थेंबामध्ये भिजलेले आपले विचार आणि आपले मन ..! शाळेचा पहिला दिवस आठवला कि आठवतो तो पाऊस जो नेमका शाळेत जाताना पडायचा . एकतर शाळेत जायचा उत्साह एवढा असायचा आणि त्या मध्ये या पावसाची भर असायची . रेनकोट, छत्री, बॅग, डब्याची पिशवी हे सगळं सावरत सोबत , रस्त्यांवरून वाहणारे पाणी आणि खाड्यांमध्...