The first rain | Rain and Me | Rutu says

      



                                                     पावसाची पहिली सर ..

                                 


 

               पावसाची पहिली सर आपल्या आठवण करून देते त्या दिवसांची ज्या दिवशी आपण आनंदी किंवा दुखी असतो.   पावसासोबतच्या प्रत्येकाच्या भरपूर आठवणी आहेत , पण सगळ्यात जवळची आठवण म्हणजे त्या पावसाच्या सरी आणि त्या पावसामध्ये भिजलेले आपण,  त्या प्रत्येक थेंबामध्ये भिजलेले आपले विचार आणि आपले मन ..! 

       शाळेचा पहिला दिवस आठवला कि आठवतो तो पाऊस जो नेमका शाळेत जाताना पडायचा . एकतर शाळेत जायचा उत्साह एवढा असायचा आणि त्या मध्ये या पावसाची भर असायची . रेनकोट, छत्री, बॅग, डब्याची पिशवी हे सगळं सावरत सोबत , रस्त्यांवरून वाहणारे पाणी आणि खाड्यांमध्ये साचलेल्या पाण्यात उड्या मारून पुढे जाण्याची मज्जाच वेगळी असायची. बालपण आणि पाऊस किती छान नातं आहे ना ..!? या नात्यामध्ये कोणताच राग, द्वेष, स्वार्थ नाहीये . या नात्यामध्ये असणाऱ्याला हि आनंदय आणि या नात्याकडे बघणाऱ्याला हि आनंदय . मी एक सांगू अम्म्म्म, असं कधी होणार नाही पण जर झालंच कि देव कधी माझ्या समोर आला न..  तरी मी हेच मागेन कि ज्या वयापासून मला (देव) तू मला समजायला लागला , ते वय मला परत दे, म्हणजेच माझं बालपण मला परत  दे. ..! 

प्रत्येकाच्या पावसाच्या जश्या खूप आठवणी आहेत , जसे तुम्ही आम्ही पावसाची वाट पाहतो ना , तसे आपल्यापेक्षा जास्त आठवण आपल्या देशाचे कारभारी म्हणजेच आपले मानाचे शेतकरी वाट पाहत असतात.जेव्हा पावसाची पहिली सर त्याच्या काळ्या मातीत पडते ना तेव्हा त्याला त्याच्या कष्टाचं फळ उगवताना त्याला दिसत. इतके दिवसापासून कष्ट करून दमलेल त्याच ते शरीर आणि मन काही क्षणातच हलकं आणि आनंदी होत . प्रत्येकाच्या आयुष्यात हा पाऊस कोणतेतरी कारण बनून येतो कोणी दुःखी असेल तर त्याच्या सोबत राहून तो एकटा नाहीये असा धीर देतो, तर कोणाच्या आनंदात सोबत राहून त्याचा आनंद साजरा करतो . असा हा पाऊस जो मला त्याच्या सोबतच्या आठवणी देऊन जातो आणि त्याच्या पुन्हा येण्याची वाट बघायला लावतो 

आजही मी वाट बघते त्याच्या पहिल्या सरीची ....!!!         

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आयुष्य आहे चालायच च ! | Journey of life | Part2| Rutu says

Ganpati Bappa Morya | Pudhchya Varshi Lavkar Ya | rutu says

Challenging tomorrow morning | rutu says