Ganpati Bappa Morya | Pudhchya Varshi Lavkar Ya | rutu says
गणूशेठ च मनोगत ..!
गणपतीच्या आगमनाची तयारी झाली , डेकोरेशन झालं , सगळी तयारी करून रात्री झोपायला उशीरच झाला . पण संपूर्ण दिवस बाप्पा च्या आगमनाच्या तयारी विषयी च डोक्यामध्ये चक्र सुरू होत . रात्री मला शांत झोप लागली खरी पण , एकदम च जोराचा आवाज आला . अरे थांबा , नका करू हे सगळं . कोणासाठी करताय हि सगळी तयारी , स्वतःसाठी कि माझ्यासाठी .?
ह्या एवढ्या मोट्या लाईट्स , हे एवढे मोठे नको त्या गाण्यांचे साउंड , किती मोठा त्याचा आवाज , अशी तयारी तर मी कधी अपेक्षित केली च न्हवती . मी तर कधी नाही बोल्लो माझ्यासाठी हि अशी तयारी करा. कि ज्या मुळे मलाच त्रास होईल .
कारण तुम्हाला या सगळ्याचा त्रास होत असेल ,असं वाटत तर नाही . कारण तुम्हाला तर सवय लागली ना .! अश्या पद्धतीने सण साजरे करायची नको ते गाणी , मोट्या आवाजात लावून नको तसा डान्स करायची ... तुमच्या या अशा तयारी मुळे , मला कधी एकदा हे अकरा दिवस संपतायत असं होत . माझे कान मोठे , डोळे मोठे म्हणून का तुम्ही एवढ्या जोरात गाणी लावून नाचता .? नको ती गाणी लावता , कि ज्या मध्ये माझ्या उत्सवाचा कुठेही उल्लेख नसतो . माझ्या आगमनावेळी आणि विसर्जनावेळी ना तुम्हाला आनंद असतो ना कधी दुःख . तुम्ही तुमच्या पद्धतीने माझं स्वागत करून , मनोरंजनाचं एक साधन करून ठेवलंय मला . अकरा दिवस तुम्ही तुमच्या परिवारामध्ये मध्ये मला सहभागी करता , पण एकदा मला बसवून गेल्यावर पुन्हा विचारत सुद्धा नाहीत . हा पण संकट मात्र आलं कि माझ्या मूषक पेक्षा जोरात धावत माझ्या जवळ येता . नेहमी तुम्ही मला तुमच्या इच्छा व्यक्त करता , त्याची पुरतता होण्यासाठी मागणी करता . या वेळी मी मागतो तुम्हाला एक मागणं , नका अशा पद्धतीने माझे स्वागत करू , साध्या सरळ पद्धतीने , शांत आणि सूर संगीताने सुद्धा मला आनंद होईल . अरे अशा पद्धतीने माझे स्वागत करून तरी बघा , अकरा दिवस काय वर्षाचे ३६५ दिवस मी तुमच्या कडे राहीन ... ! आणि तुमच्या परिवारामध्ये सामील होईल .
अचानक जाग आली आणि समजलं ते स्वप्न होत , आणि त्या स्वप्नातच सत्यता होती . ज्या गणेशा साठी एवढ्या हट्टहासाने सगळी तयारी करतो तोच गणेशा आनंदात आहे का ? याचा कधी विचार सुद्धा केला नाही . जेव्हा स्वतःच्या आनंदासाठी त्याच्याकडे जात ना , तेव्हा त्याचा हि आनंद कशा मध्ये आहे , हे पण लक्षात घ्या ...!
बाकी मग आहेच , " गणपती बाप्पा मोरया , पुढच्या वर्षी लवकर या " ..!
तुम्हाला माझा हा ब्लॉग आवडला आणि पटला असेल तर नक्की share करा .. धन्यवाद .

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा