आयुष्य आहे चालायच च ! | Journey of life | Part2| Rutu says

 



                                                      आयुष्य आहे चालायचं च ..!

                                                                            




मला न माझ्या कॉलेज मध्ये असतानाचा एक किस्सा आठवला . माझी मैत्रीण मला म्हणायची ऋतू आपल्या आयुष्यात अशी एक सिस्टिम किंवा असं काहीतरी बटण हवं होत कि आपल्या समोर आपली न आवडणारी व्यक्ती आली कि आपण ऍड सारखं त्यांना स्किप करून पुढे जाऊ शकु . कारण त्यांच्यामुळे  कधी आपलं मन किंवा आपले विचार बदलत जातात स्वतः बद्दल , आपण त्यांचा सारखं वागू लागतो , पण काही व्यक्ती अशा पण असतात कि त्यांना समजत असत कि या व्यक्तीला आपल्या पासून त्रास होतोय किंवा आपल्या सहवासात तो सुरक्षित किंवा आनंदी राहू शकत नाहीये तरी पण ते लोक आपल्या समोर वारंवार येतच राहतात , कारण त्यांना त्या मध्ये आनंद भेटत असतो . आपण खूप ठरवतो ग ऋतू कि अशा व्यक्ती समोर आल्या कि आपण लक्ष नको देयला किंवा जस आधी म्हणलं तस स्किप करू पण नाही होत न ग तस . खरतर ती जे बोलत होती हे खरच तितकंच बरोबर होत.  कारण हल्ली तशी माणसे खूप असतात. आणि आताच्या आपल्या आयुष्यात आपल्याला आपल्या च माणसाकडून खूप काही शिकायला मिळत . मुळात ते दाखवतच असतात कि ते आपले आहेत , आणि ते आपल्या बद्दल चांगला विचार करतायत , पण जर हि गोष्ट सारखी सारखी होऊ लागली तर नंतर आपल्यालच त्रास होऊ लागतो पण त्या समोरच्या व्यक्तीला काडीमात्र फरक पडत नाही . कारण ती व्यक्ती मुळातच तशी असते जिच्या पासून काहींना आनंद तर काहींना त्रास होतो आणि ती व्यक्ती आनंदी पण त्याच व्यक्तीला ठेवू शकते ज्यांच्या मध्ये त्या व्यक्तीचा  फायदा आहे . अशा व्यक्ती आपल्या समोर एक आणि इतरां समोर एक असं वागतात कारण आपण जर त्यांच्या बद्दल कोणाला सांगायला गेलो तर त्यांना वाटणारच नाही कि ती व्यक्ती अशी आहे . काय आठवतायत का अशा व्यक्ती तुम्हाला पण , हे वाचता वाचता तुम्हाला पण असं वाटतंय का कि अरे हा हे तर माझ्या बाबतीत पण घडलंय.  पण सध्या मी तरी शोधते ते स्किप वाल बटण तुम्हाला जर सापडलं तर मला नक्की सांगा ! 
बाकी आयुष्य आहे ........ चालायचंच !

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

Ganpati Bappa Morya | Pudhchya Varshi Lavkar Ya | rutu says

Challenging tomorrow morning | rutu says