Different types of people in your life | Rutu Says
आपण आणि आपल्या आयुष्यातील व्यक्ती ..!
आपल्याला हवी असणारी प्रत्येक गोष्ट आपल्याला मिळेलच असं नाही . पण हा आपण ती मिळवण्यासाठी प्रयत्न मात्र नक्कीच केला पाहिजे . कधी कधी आपल्या आयुष्यात अशा गोष्टी घडतात कि ज्याची आपल्याला कल्पना सुद्धा नसते आणि चाहूल सुद्धा लागत नाही . पण तरीही आपल्याला ती गोष्ट खूप आवडायला लागतेय .
आपल्या आयुष्यात येणाऱ्या माणसांच सुद्धा असच असत का ..!? कधी कधी आपल्या आयुष्यात अशी व्यक्ती येते कि जिच्यासोबत आपण खूप थोडा टाईम घालवून आपल्याला ती खूप जवळची आणि आपलीशी वाटते . अगदी असं वाटत आपण त्या व्यक्ती ला खूप पूर्वी पासून ओळखतो आणि त्या व्यक्तीच्या सहवासात आहोत .
काही व्यक्ती अशा असतात ज्यांच्या सोबत आपण लहानपणापासून असतो किंवा बरेच वर्ष आपण एकत्र असतो तरी सुद्धा आपण त्या व्यक्ती समोर कधीच मनमोकळे पणाने बोलू शकत नाही. खरतर आपण त्या व्यक्तीला आपलं जवळच असं मानतच नाही . कारण आपण खूप वर्षांपासून जवळ जरी असलो तरी आपले विचार मात्र कधीच जुळत नाहीत , स्वभाव कधी पटत नाहीं .
पण तेच जर आपण आपले विचार पटणाऱ्या व्यक्ती सोबत असलो , आपला स्वभाव समजून घेणाऱ्या व्यक्ती सोबत असलो , तर आपलं त्या व्यक्ती सोबतच नातं खूप कमी वेळात घट्ट होऊन जात. आणि अशा व्यक्तींना आपल्या मनातील गोष्टी नसांगता कळतात सुद्धा. आणि कळायलाच पाहिजेत कारण मला असं वाटत मागून मिळालेली कोणतीच गोष्ट हि कधीच आपली नसते , आणि ती फार काळ टिकत हि नाही . त्यामुळे आयुष्यात अशी एक व्यक्ती नक्की निवडा जी खूप कमी वेळात आपल्याला आपल्यापेक्षा जास्त ओळखेल आणि समजून घेईल .
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा