New year and new old people and their new thoughts | Rutu says

 




                                               नवे वर्ष व नवी जुनी माणसे आणि त्यांचे नवीन विचार...!


                                    


आज मी मोबाईल मध्ये एक वाक्य वाचले , कदाचित म्हणूनच मला आज  लिहावस वाटल . एका शब्दाने किंवा एका वाक्याने सुद्धा आपण आपल्यात बराचसा बदल घडवू शकतो. आणि ते वाक्य म्हणजे कि आपल्या प्रत्येक जणांचे विचार किंवा आपले मत हे आपल्याला हव्या असणाऱ्या प्रत्येक व्यक्ती सोबत त्या त्या वेळी जुळतीलच असं नाही . खरंय ना ..!?😕👀 

                 कधी कधी आपले विचार आपण आपल्या पुरते आणि समोरच्या व्यक्तीसाठी म्हणजे आपण आपल्या दोघांसाठीचे करत असतो , आणि त्यावेळी समोरची व्यक्ती त्याचा विचार असते . हीच गोष्ट आपल्या बाबतीतही घडते . पण म्हणून आपण आपला किंवा समोरच्या व्यक्तीचा विचार करणे सोडून देत नाही ना . प्रत्येक व्यक्तीला त्या त्या परिस्थिती नुसार वागावं लागत आणि मान्य आहे कि परिस्थिती असेल तसच माणसाने वागले पाहिजे , पण म्हणून आपण त्या परिस्थिती मध्ये समोरच्या व्यक्तीला विसरू शकत नाही ना . उलट त्या परिस्थिती मध्ये आपण आपल्या व्यक्तीला जवाबदारीने सोबत ठेवणे गरजेचे असते . 

समोरच्या व्यक्तीच्या विचारात आपले विचार मिसळून आलेली परिस्थिती सावरायची असते . हा पण हे नक्की आहे कि प्रत्येक व्यक्ती आपल्या सारखा विचार नाही करत , पण मग आपण तरी कुठे त्या व्यक्ती सारखं विचार करत असतो . म्हणून कदाचित आपल्याला आपल्या सारखी  विचार करणारी व्यक्ती हि कधीच मिळणार नाही , कारण प्रत्येक जण त्याच्या त्याच्या कुवतेनुसार किंवा क्षमतेनुसार विचार करत असतो . आणि जशी परिस्थिती येईल तशी प्रत्येक व्यक्तीचे विचार सुद्धा बदलत असतात . आणि मला असं वाटत बदलायलाच पाहिजे त्यामुळे आपल्याला आपल्या विचारांची क्षमता समजते . 

                  आणि त्यामुळेच आपल्याला समजते कि , आपण कधीहि कोणत्या व्यक्तीच्या विचारांवर किंवा त्याच्यावर अवलंबून न राहता , स्वतः आपल्या विचारांवर ठाम राहिलेले कधीही जवाबदारीचे ठरते . आणि ते विचार समोरच्या व्यक्तीला सुद्धा सांगितले तर दोघांसाठी फायदेशीर आणि सोयीचे ठरते .     ज्यामुळे नातं आजून घट्ट राहत , आणि कायम टिकून राहत . 

अम्म्म्मम नवीन वर्षासाठी आपण आपल्यात हा बदल तर नक्की करू शकतो हो ना ...!?? 💭💭💭

Ok  मग Good Bye 2022 & Welcome 2023 .. Happy New Year Guys n Take Care 😇💫💕

टिप्पण्या