पोस्ट्स

जून, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

In Lock down | What then..? | rutu says

इमेज
                                          काय मग अजून ... ???                            काय मग अ जून ?...  हा प्रश्न कोणी विचारला तर एकतर हसू तरी येत , किंवा  त्या व्यक्तीचा राग तरी येतो . सध्याच्या लॉकडाऊन  च्या परिस्थिती मध्ये काय मग अजून असे  विचारणे चेष्टेचा विषय ठरलेला आहे . कारण या लॉकडाऊन मध्ये काय नवीन करणार , कुठे जाणार , कोणाशी बोलणार ,  आणि  महत्वाचं म्हणजे आजचा दिवस कसा घालवणार ...! माझ  जर तुम्ही विचारलं तर सकाळी कॉलेज लेक्चर, दुपारी मम्मी ला मदत , पुन्हा प्रोजेक्ट लेक्चर , नंतर माझ्या आवडीचे काम झाडांना पाणी घालणे आणि टेरेस वर फिरणे पुन्हा नंतर डिजिटल मार्केटिंग चे लेक्चर . ते झालं कि घरातल्यांसोबत वेळ घालवणे  नंतर थोडं फार इकडे तिकडे होत पण असाच रोजचा दिवस  माझा जातो . आणि विचार आले कि लिखाण करणे जे मी तुमच्या पर्यंत पोहचवत असते .  आज लिहाय...

Me and my window | rutu says

इमेज
          मी आणि माझी खिडकी ...  आपल्याला एकटं वाटलं कि आपण आपल्या आवडत्या ठिकाणी किंवा आवडत्या व्यक्ती सोबत जाउन बसतो . आणि आपण जेव्हा  आनंदी असतो तेव्हा आपण आपल्या आनंदाचं कारण सगळ्यांना सांगतो , आपण आपला आनंद वाटून घेतो . माझं पण असच आहे . मी दुःखी असले , चिडलेले असले , रागात असले , किंवा आनंदी असले कि मी माझ्या रूम च्या खिड्की जवळ जाऊन बसते . तिथून समोरचा निसर्ग माझ्याकडे उत्सुकतेने पाहत असतो , कि आज काय बरं झालं असेल हिला कि हि खिडकीत येऊन बसले . ?!  पण खरच मी स्वतःला खूप भाग्यवान समजते , मी  सातारा सारख्या सहयाद्रीच्या कुशीत असलेल्या शहरात राहते . माझ्या घराच्या चारी बाजूने निसर्ग दिसतो, मस्त डोंगररांगा त्यांची हिरवळ खूप छान असा नजारा दिसतो  .  जो प्रत्येक ऋतूची चाहूल देतो .  आणि माझी खिडकी याच खिडकीतून मला हा निसर्ग रोज नव्याने भेटतो . माझ्यावर कोणी रागवले कि मी  खिडकीच्या इथे येऊन बसते आणि सगळा राग तिकडे काढते , माझ्यावर कोणी चिडले कि मी खिडकी जवळ जाऊन बसते आणि तिकडे चिडच...