Me and my window | rutu says

          मी आणि माझी खिडकी ... 




आपल्याला एकटं वाटलं कि आपण आपल्या आवडत्या ठिकाणी किंवा आवडत्या व्यक्ती सोबत जाउन बसतो .
आणि आपण जेव्हा आनंदी असतो तेव्हा आपण आपल्या आनंदाचं कारण सगळ्यांना सांगतो , आपण आपला आनंद वाटून घेतो . माझं पण असच आहे . मी दुःखी असले , चिडलेले असले , रागात असले , किंवा आनंदी असले कि मी माझ्या रूम च्या खिड्की जवळ जाऊन बसते . तिथून समोरचा निसर्ग माझ्याकडे उत्सुकतेने पाहत असतो , कि आज काय बरं झालं असेल हिला कि हि खिडकीत येऊन बसले . ?! 
पण खरच मी स्वतःला खूप भाग्यवान समजते , मी  सातारा सारख्या सहयाद्रीच्या कुशीत असलेल्या शहरात राहते . माझ्या घराच्या चारी बाजूने निसर्ग दिसतो, मस्त डोंगररांगा त्यांची हिरवळ खूप छान असा नजारा दिसतो  .  जो प्रत्येक ऋतूची चाहूल देतो . 
आणि माझी खिडकी याच खिडकीतून मला हा निसर्ग रोज नव्याने भेटतो . माझ्यावर कोणी रागवले कि मी  खिडकीच्या इथे येऊन बसते आणि सगळा राग तिकडे काढते , माझ्यावर कोणी चिडले कि मी खिडकी जवळ जाऊन बसते आणि तिकडे चिडचिड  करते . अशी माझी बिचारी खिडकी माझं सगळं काही सहन करते . हा पण कधी कधी हीच खिडकी माझा फॅमिली कट्टा पण बनते . माझ्या सोबत माझं आणि माझ्या पप्पांच्या गप्पा ऐकते . आमच्या आनंदात सहभागी होते . सकाळी मस्त सूर्याच्या किरणातून मला उठवते , रात्रीच्या चंद्राच्या प्रकाशात झोपवते . मला माझ्या प्रत्येक दिवसाच्या सुरवातीसाठी फ्रेश करते . माझ्या प्रत्येक लिखाणाला प्रोत्साहन देते.  एकंदरीत काय माझी खिडकी माझं सगळं काही एकूण घेते आणि मला नेहमी उत्साही ठेवते  ... !!

काय तुमच्या पण आयुष्यात असेल ना अशी एक जागा जिथे तुम्ही तुमचं दुःख , आनंद वाटून घेत असाल . अशी जागा जी फक्त तुमचं ऐकून घेते , आणि ती जागा तुम्हाला खूप आवडते , तुम्ही ती जागा हक्काची समजता . आणि ती  प्रत्येक वेळेला तुम्हाला हेच भासवून देते कि जे झालं ते झालं आता पुन्हा नव्याने सुरवात कर ... 





Writing By : Rutuja Thite 
आवडले तरी नक्की share करा ... 

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आयुष्य आहे चालायच च ! | Journey of life | Part2| Rutu says

Ganpati Bappa Morya | Pudhchya Varshi Lavkar Ya | rutu says

Challenging tomorrow morning | rutu says