In Lock down | What then..? | rutu says

    

                                     काय मग अजून ... ???


                          


काय मग अजून ?...  हा प्रश्न कोणी विचारला तर एकतर हसू तरी येत , किंवा  त्या व्यक्तीचा राग तरी येतो . सध्याच्या लॉकडाऊन च्या परिस्थिती मध्ये काय मग अजून असे विचारणे चेष्टेचा विषय ठरलेला आहे . कारण या लॉकडाऊन मध्ये काय नवीन करणार , कुठे जाणार , कोणाशी बोलणार ,  आणि महत्वाचं म्हणजे आजचा दिवस कसा घालवणार ...! माझ जर तुम्ही विचारलं तर सकाळी कॉलेज लेक्चर, दुपारी मम्मी ला मदत , पुन्हा प्रोजेक्ट लेक्चर , नंतर माझ्या आवडीचे काम झाडांना पाणी घालणे आणि टेरेस वर फिरणे पुन्हा नंतर डिजिटल मार्केटिंग चे लेक्चर . ते झालं कि घरातल्यांसोबत वेळ घालवणे  नंतर थोडं फार इकडे तिकडे होत पण असाच रोजचा दिवस  माझा जातो . आणि विचार आले कि लिखाण करणे जे मी तुमच्या पर्यंत पोहचवत असते . 

आज लिहायचे कारण असे कि , आज खूप जणांनी विचारले " काय मग अजून "...  हे असं विचारल्यावर काय उत्तर देयचे हेच समजत न्हवते.  पण माझं तर ठीके मी आणि माझे लेक्चर मध्ये दिवस निघून जातो , पण इतर लोकांना हाच प्रश्न विचारल्यावर काय उत्तर येत असेल...? खरच या लॉकडाऊन मुले सगळेच किती लांब गेले ना . आधी आपल्याला दिवसाचे २४ तास पुरायचे नाहीत , आणि अता दिवसातला प्रत्येक मिनिट कधी संपणार असा प्रश्न पडतो .  म्हाताऱ्या माणसांचा रोजचा दिवस त्या चिनी लोकांना शिव्या घालणार निघून जातो , तर घरातल्या बायकांचा स्वयंपाक घरात निघून जातो . एकमात्र आहे , या गृहिणींना या लॉकडाऊन चा तसा फारसा असा फरक पडला नाही . कारण त्यांचे काम कधी थांबले नाही आणि कधी थांबणार सुद्धा नाही . पण काही लोकांनी अशा दिवसांमध्ये आपल्या आवडीची कामे केली . ज्यातून त्यांना स्वतःला आनंद मिळेल , ते स्वतः कुठेतरी त्यांचा मध्ये रमून जातील . आणि अत्ताच्या दिवसांमध्ये हेच तर महत्वाचे आहे . स्वतःला आनंदी ठेवण्याचे, थोड्या वेळा पुरता का होईना पण स्वतःचा विचार करण्याचे . मग काय नंतर आहेच कि इतरांना विचारायला ...        "काय मग अजून " ???



                                                                 writing by : Rutuja Thite  

                                                                  आवडले तर नक्की शेयर करा आणि कंमेंट करा 

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आयुष्य आहे चालायच च ! | Journey of life | Part2| Rutu says

Ganpati Bappa Morya | Pudhchya Varshi Lavkar Ya | rutu says

Challenging tomorrow morning | rutu says