In Lock down | What then..? | rutu says
काय मग अजून ... ???
आज लिहायचे कारण असे कि , आज खूप जणांनी विचारले " काय मग अजून "... हे असं विचारल्यावर काय उत्तर देयचे हेच समजत न्हवते. पण माझं तर ठीके मी आणि माझे लेक्चर मध्ये दिवस निघून जातो , पण इतर लोकांना हाच प्रश्न विचारल्यावर काय उत्तर येत असेल...? खरच या लॉकडाऊन मुले सगळेच किती लांब गेले ना . आधी आपल्याला दिवसाचे २४ तास पुरायचे नाहीत , आणि अता दिवसातला प्रत्येक मिनिट कधी संपणार असा प्रश्न पडतो . म्हाताऱ्या माणसांचा रोजचा दिवस त्या चिनी लोकांना शिव्या घालणार निघून जातो , तर घरातल्या बायकांचा स्वयंपाक घरात निघून जातो . एकमात्र आहे , या गृहिणींना या लॉकडाऊन चा तसा फारसा असा फरक पडला नाही . कारण त्यांचे काम कधी थांबले नाही आणि कधी थांबणार सुद्धा नाही . पण काही लोकांनी अशा दिवसांमध्ये आपल्या आवडीची कामे केली . ज्यातून त्यांना स्वतःला आनंद मिळेल , ते स्वतः कुठेतरी त्यांचा मध्ये रमून जातील . आणि अत्ताच्या दिवसांमध्ये हेच तर महत्वाचे आहे . स्वतःला आनंदी ठेवण्याचे, थोड्या वेळा पुरता का होईना पण स्वतःचा विचार करण्याचे . मग काय नंतर आहेच कि इतरांना विचारायला ... "काय मग अजून " ???
writing by : Rutuja Thite
आवडले तर नक्की शेयर करा आणि कंमेंट करा

खुबच छ्यान
उत्तर द्याहटवा