human nature | rutu says
इतरांचा हि विचार करा...
विचार माणसांप्रमाणे असतात . जस जशी माणसांची प्रवृत्ती बदलत जाते किंवा माणूस हि बदलतो तसेच त्याच्या बरोबर त्याचे विचारही बदलतात त्या माणसाचे मत त्याचे विचार हे प्रत्येक गोष्टींसाठी वेगळे होतात मग एखादा माणूस ज्या बदद्ल विचार करीत असतो ती सजीव असुदे किंवा निर्जीव तो त्याचे मत काहीही न विचार करता मांडून जातो
हा ! आता जर ती गोष्ट निर्जीव असेल तर त्याच्या विचारांचा आणि मतांचा त्याच्यावर काहीही परिणाम होणार नाही पण हाच होणारा परिणाम सजीव गोष्टींवर होईल का ???
याचाच तर आपण कधी विचार करत नाही !... आपल्या बोलण्याचा,आपण केलेल्या विचारांचा आणि आपण मांडलेल्या मतांचा समोरच्यावर काय परिणाम होईल किंवा आपण मांडलेल्या मतांवर तो काय मत व्यक्त करील ? ,आपण केलेल्या विचारांवर तो काय विचार करील ? या गोष्टींचा काहीही ताळतंत्र न ठेवता आपण आपले मत आणि विचार समोरच्यावर लादतो .आणि आपल्या विचारांवर चालण्यासाठी प्रवृत्त करतो हो ना ...!
बघाबर आपल्याला हि छोटी वाटणारी गोष्ट ती कधी आपल्या आयुष्यात मोठा परिणाम देवून गेली का ...???
काय करताय ना विचार...?!

Nice
उत्तर द्याहटवा👍👍👌👌👌
उत्तर द्याहटवाAtisundar🙌🙌🙌
उत्तर द्याहटवा