Friendships that seem unfamiliar but familiar | true story by rutu
Rutu Says' ... अनोळखी पण ओळखीची वाटणारी ...
खूप वेळ झाला पण गाडी काही आली न्हवती, मी आणि माझे आजोबा स्टॅन्ड वरती उन्हा मध्ये १ तास उभे होतो. आम्हाला फलटनं वरून वाई ला जायचं होत . आम्ही खूप चौकशी पण केली गाडीची, टाइम विचारला पण आम्हाला प्रत्येक वेळेला एकच उत्तर मिळायचं , येईल गाडी १०मिनटं थांबा तिकडूनच गाडी उशीरा सुटली ! माझ्या सोबत आजोबा होतेच पण एक खूप वैतागलेली कंटाळली मुलगी माझ्या बाजूला थांबलेली . माझे आजोबा गाडीची चौकशी करून आले कि ती फक्त एकच विचारायची काय म्हणाले ग मी म्हणायचे अजून १० मिनटे ! थोड्या वेळाने आमची चर्चा सुरु झाली बस स्टॅन्ड वर कि गाडी किती उशिरा येतात आणि ड्रायव्हर्स कसे गाडी चालवतात ,आमची चर्चा चालू असतानाच गाडी आली आम्ही दोघीनी सुटकेचा श्वास सोडला आणि धावत गाडी जवळ गेलो जागा पकडण्यासाठी खूप गर्दी, धक्का मारून आधी आत जाणारी ती मानस , तरी माझ्या आधी ती गाडी मध्ये चढली आणि नन्तर मी चढले ,मी माझ्या आणि आजोबांसाठी बसायला सीट बघतच होते तेवढ्यात तिने हाक मारली , आग ये इथे मे तुझी आणि आजोबांची जागा पकडलीये .
फायनली ! आम्हाला जागा मिळाली . मी आणि ती दोघी शेजारी बसलो आणि आजोबा पुढच्या सीट वरती बसले , नेहमीप्रमाणे मी पाण्याची बॉटल विसरलेले होते , आणि तिने विचारलं पाणी पिणारेस का ? नाही म्हणायचं होत पण तहान लागलेली पाणी तर पेयच होत तिला कदाचित माझ्या चेहऱ्या वरच्या भावावरून समजलं असावं , तीच म्हणली अग घे पाणी खूप टाइम आपण थांबलेलो आजोबाना पण दे . आम्ही पाणी पिलं कंडक्टर ने तिकिट्स काढले ड्राइवर काका आले आणि फायनली गाडी चालू झाली. आणि आमच्या गप्पा पण चालू झाल्या .
ती तिच्या भावाच्या लग्नाला चाल्लेली होती आणि मी मामाच्या गावाला. आम्ही अडीच तास गप्पा मारत होतो तिने काही फोटोस दाखवले तिच्या फ्रेंड्स चे ,फॅमिली चे ,तिच्या ट्रिप चे ,खूप काही सांगत होती ती मला तिच्याशी बोलताना असं वाटलंच नाही मी अनोळखी मुलीसोबत बोलते तीने त्या अडीच तासामध्ये तिची स्कुल लाईफ, कॉलेज लाईफ ,फॅमिली टाइम सगळं काही एक्सप्लेन केलं. मी सुद्धा तिच्यासोबत बोलत होते पण तीच बोलणं इतकं होत , तिला मला इतकं सांगायचं होत कि ती शांतच नाही बसायची. मी तिच्या कोणत्याच फ्रेंड्स ला न भेटता त्यांना ओळखू लागले , तिच्या फॅमिलीला न भेटता त्यांना ओळखू लागले.
इतकं ती माझ्याशी बोलता होती बोलता बोलता आम्हाला समजलं तिचा स्टॉप आला आणि ती मला बोल्ली माझा भाऊ आलाय मला घेयला मी निघते , आणि मजेशीर गोष्ट अंशी कि जाताना आम्ही एक मेकींना विचारलं अग नाव तरी सांग त्यावर दोघी एकदम बोल्लो ऋतुजा ... आणि ती काळजी घे भेटू परत म्हणून गाडीतून उतरली. मला हा अनुभव माझ्या आयुष्या मधला खूप आनंदी आणि अनोळखी असून ओळखीचा असणारा वाटतो .
तुम्हाला भेटलीयेका तुमच्याच नावाची , अनोखी पण ओळखीची वाटणारी व्यक्ती ... ?!
तुम्हाला वरील पोस्ट आवडली असेल तर नक्की लाईक करा शेयर करा आणि कंमेंट करा ...

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा