Happiness That Shares Hidden Sorrows | Rutu says
Be Happy...
प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये प्रॉब्लेम्स असतात. कोणीच कधीच प्रॉब्लेम्स नाही म्हणून खुश आहे असे नाही . प्रत्येकाचं आयुष्य आनंद आणि दुःख यांनी वाटून घेतलेलं असत . कोणी आपले दुःख सगळ्यांसोबत वाटून घेत तर किंवा कोणी आपल्या पुरतंच ठेवत . तसेच आनंदाचे पण आहे , पण बऱ्याच वेळा आपण आपला आनंद सगळ्यांसोबत वाटून घेतो . पण काही लोकांचा आनंद आपल्या पुरताच असतो , जसे कि लहान मुलाने घरच्यांपासून चोरून खाल्लेले चोकोलेट्स , घरातील बायकांनी नवऱ्याच्या खिशातून न सांगता घेतलेले पैसे , शिक्षकांना कळू न देता बुडवलेलं लेक्चर्स . काय आठवतायत ना दिवस ... हे आनंद आपल्या पुरते आपण ठेवतो आणि वेळ निघून गेली कि ते आठवून सगळ्यांसोबत वाटून घेतो .
पण दुःखाचं तस असत का ओ. !? एकतर घडलेली परिस्थिती किंवा झालेला प्रॉब्लेम सांगतो तरी नाहीतर आपल्या पुरताच ठेवतो . कारण आपल्यावर आलेली परिस्थिती आणि आपला प्रॉब्लेम समोरचा स्वीकारेल का याची जास्त भीती वाटते . पण मला अस वाटत आपण आपले प्रॉब्लेम्स आणि आपली परिस्थिती समजावून समोरच्याला सांगितली तर आपले प्रॉब्लेम्स पटकन सुटतात. हा आता काही वेळा समोरचा आपली परिस्थिती पटकन स्वीकारेल किंवा नाही ,पण तुम्ही तुमची सांगितलेली परिस्थिती तुम्हाला वेगळंच समाधान देईल. आपल्या भाषेत सांगितलं तर एकदम भारी वाटेल .!! आणि तुमच्या मध्ये झालेल्या संवादातून जे तुमचं दुःख असेल , तुमची परिस्थिती आणि तुमचा प्रॉब्लेम असेल याला उत्तर मात्र नक्कीच मिळाले असेल . आणि यातून मिळालेला आनंद शब्दातून न मांडता येणारा असेल. बघा आलो ना परत आनंदापाशीच .... !
मग तुम्ही तुमचे दुःख , प्रॉब्लेम्स , तुमच्यावर आलेली परिस्थिती सांगून तर बघा मिळेल तुम्हाला पण उत्तर ... आणि तुम्ही पण तुमचा आनंद वाटून घेण्यासाठी नक्की उत्सुक असाल !!!
Writing by : Rutu
आवडले तर नक्की share करा ... Thank You And Be Happy

Nice
उत्तर द्याहटवा