Talk to you soon and keep up the good content.| Rutu Says

                                                     



                                                    एकदा बोलून तरी बघा ..!

                                       




                          आपला प्रत्येक दिवस आपल्या मनासारखा जाईल असं नाही ना . काही गोष्टी आपण करून सुद्धा आपण केल्या नाहीत म्हणूंन ऐकून घ्याव्या लागतात , तर काही गोष्टी आपण केल्या नसल्या तरी केल्या म्हणून ऐकून घ्याव्या लागतात . माणसाकडून बऱ्याच गोष्टी घडतात चांगल्या , वाईट त्या मध्ये आपण वाईट गोष्टीला चुका झाल्या असं म्हणतो . माणसाच्या चुका झाल्या कि त्याच्या चुकांना सतत मागच्या गोष्टींचा संदर्भ देवून त्याला हिणवलं जात . त्याला सतत चुकीच्या नजरेनं बघितलं जात . ती व्यक्ती कितीही चांगली वागू दे ,पण त्याच्या चुका काढणे , आणि त्याच्या चांगल्या केलेल्या कामाला दाद न देणे , कि ज्याने त्या व्यक्तीला सुद्धा चांगलं वागण्याचा हुरूप निघून  जातो.  . 

                       त्या व्यक्तीला सतत झालेल्या चुका , बोल्लेली माणसे आणि त्या मागचे विचार आठवत राहतात . अस नाही त्या व्यक्तीला चूक मान्य नसते , तर त्या व्यक्तीला झालेली चूक सुधारायची असते .  ती व्यक्ती सगळ्यांसमोर आनंदी राहते , पण आतून मात्र अस्वस्थ झालेली असते . त्या व्यक्तीला  सतत वाटत असत आपण कोणाशी तरी बोलावं ,आपला अस्वस्थपणा सांगावा , पण त्या वेळेला त्या व्यक्ती सोबत बोलणारे कोणी नसत. आणि तीच ऐकून घेणार पण कोणी नसत . आजूबाजूच्या आवाजाने ती व्यक्ती आतून पूर्णपने शांत झालेली असते . 

                         जर अशी कोणी व्यक्ती तुमच्या सोबत असेल ,आणि ती चांगली वागत असेल तर तिला नक्की साथ दिली पाहिजे , तिच्यात नवीन ऊर्जा निर्माण केली पाहिजे , ती अस्वस्थ असेल तर तिच्याशी बोल्ले पाहिजे , कदाचित तिचा अस्वस्थ पणाचा तो शेवटचा दिवस असेल .  ती व्यक्ती सुद्धा तुमच्यात नवीन ऊर्जेने सामावून जाईल . आणि ती व्यक्ती तुम्हाला जशी हवीये तशी नक्की मिळून जाईल . 

                         काय तुमच्यात किंवा तुमच्या आजूबाजूला आहे का कोणी अशी व्यक्ती जीला तुमची गरज आहे .?

                                                                                                मग एकदा बोलून तर बघा..!         




तुम्हाला हि पोस्ट आवडली असेल तर नक्की  share करा कंमेंट करा आणि तुम्ही सुद्धा तुमचे असे अनुभव सगळ्यांसमोर  सांगू इच्छिता तर  मला नक्की कळवा मी ब्लॉग च्या माध्यमातून नक्की तुमचे विचार अनुभव सगळ्यांपर्यंत पोहचवेन 

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आयुष्य आहे चालायच च ! | Journey of life | Part2| Rutu says

Ganpati Bappa Morya | Pudhchya Varshi Lavkar Ya | rutu says

Challenging tomorrow morning | rutu says