Today's Vaccine News | Rutu says

 




                                                  लस घ्या.. ,  सुरक्षित रहा ..!





                                        

                                     इंजेक्शन म्हणले कि सगळ्यांनाच भीती वाटते .  डोळ्यांसमोर लांब लचक सुई दिसते.पण काही इंजेक्शन  आणि मेडिसिन घेणे अत्यंत आवश्यक असतात  . त्यावर आपले शारीरिक स्वास्थ्य अवलंबून असते . सध्याच्या कोरोना परिस्थिती मध्ये आपण आपली काळजी घेणे खूप गरजेचे आहे ,आपल्यासाठी  सुद्धा आणि आपल्या  माणसांसाठी सुद्धा . वेळेवर हात धुणे , गर्दी मध्ये  मास्क वापरणे , शक्य होईल तितके आपल्या आणि समोरच्या व्यक्ती मध्ये अंतर ठेवणे . आणि खूपच जरुरीचे असेल तरच बाहेर जाणे . या सगळ्या गोष्टी या कोरोना परिस्थिती मध्ये पाळणे गरजेच्या आहेतच . त्याच बरोबर व्हॅक्सिन (लस) घेणे सुद्धा खूप गरजेचे आहे . 

                                 ज्या वेळी लसीची सुरुवात झाली म्हणजे १६ जानेवारी २०२१ मध्ये पहिला सेट जेव्हा काही सरकारी हॉस्पिटल्स मध्ये उपलब्ध झाला . त्या वेळी लस घेण्यासाठी ऑनलाईन रेजिस्ट्रेशन या प्रक्रियेने लस मिळत होती . त्यामुळे ज्यांना या ऑनलाईन प्रक्रिये बद्दल समजत न्हवते किंवा ज्यांच्या कडे अशा काही ऑनलाईन प्रक्रियेसाठी काही साधने उपलब्ध न्हवते अशा काही लोकांना लस घेता आली नाही . काहींना रेजिस्ट्रेशन करताना खूप अडचणी आल्या , काहींना त्यावेळी , त्यावेळेमध्ये रेजिस्ट्रेशन करता येत न्हवते , काहींना इंटरनेटच्या अडचणी आल्या , अश्या बऱ्याच कारणांमुळे लस घेता नाही आली . आणि काहींचं तर खूप छान कारण होत कि, सगळे साधने उपलब्ध असताना , याना इंजेक्शन ची भीती वाटते म्हणून नाही घेतली

                                   आजचा आपला व्हॅक्सिन चा काउंट आहे ८२,७२,९७,९७३ हा कोविशील्ड आणि कोव्हॅक्सिन चा मिळून काउंटर लिस्ट आहे . 







तुम्ही कोवीन च्या साईट वर जाऊन हा काउंट पाहू शकता . हा काउंट १ का सेकंदाला वाढत चाल्लाय . खरच हि खूप मोठी गोष्ट आहे सगळ्यांसाठी , कि सगळ्यांना आता समजत चाल्लंय , पटतंय कि व्हॅक्सिन हे खूप गरजेचे आहे . आणि आता प्रत्येक हॉस्पिटरल्स मध्ये व्हॅक्सिन भरपूर प्रमाणात उपलब्ध झाले आहेत . आणि त्याच कारणाने ऑनलाईन प्रक्रिया कमी होत चाललीये ,आपल्याला जागेवर जाऊन व्हॅक्सिनेशन मिळत आहे . त्यामुळे मला असे वाटते कि सगळ्यांनी व्हॅक्सिन घेतले पाहिजे , आपली आणि आपल्या कुटुंबाची काळजी आपणच घेतली पाहिजे ..!





तुम्हला हि पोस्ट आवडली असेल तर इतरांना नक्की पुढे हि लिंक पाठवा . त्याच बरोबर तुमचे हि काही विचार असतील किंवा अनुभव असतील तर मला नक्की कळवा मी त्या माझ्या ब्लॉग द्वारे नक्की सगळ्या पर्यंत पोहचवेन .. 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आयुष्य आहे चालायच च ! | Journey of life | Part2| Rutu says

Ganpati Bappa Morya | Pudhchya Varshi Lavkar Ya | rutu says

Challenging tomorrow morning | rutu says