Today's Good Experience | Rutu Says
अनुभव...
आपल्याला किती छान वाटत ना कीं आपली कोणीतरी आपल्याच आवडत्या गोष्टीसाठी वाट बघत . तसंच काहीस माझ्या बाबतीत आज झालं . मला लिहण्याची खूप आवड आहे , म्हणून मी ती माझ्या पूर्ती न ठेवता सगळ्यांपर्यत पोहचवली , आणि तीच माझी आवड माझी न राहता आज बऱ्याचजणांची आवड आणि सवय झाले . खूप छान वाटत जेव्हा आपल्याला आपल्याच गोष्टीसाठी विचारलं जात आणि वाट पहिली जाते.
मला माझ्या ब्लॉग बद्दल या आठवड्यात खूप जणांनी विचारलं . आणि म्हणून म्हणलं आज आपण आपलाच छान असा अनुभव तुमच्या पर्यंत पोहचवावा . प्रत्येकाच्या अश्या प्रत्येक गोष्टी असतात . आणि प्रत्येकाला वाटतं आपल्याला आपल्याच आवडत्या गोष्टींबद्दल विचारावं . आपण त्यांच्या पर्यंत आपल्या गोष्टी पोहचवाव्या .
काही गोष्टी अशा असतात ,आपण बोलू शकत नाही ,पण आपल्याला त्या गोष्टी इतरांना सांगायच्या असतात . आपण त्या गोष्टी सांगायला साधन शोधतो , आणि त्या इतरांपर्यंत पोहचवतो . कधी नाही जमले तर त्या आपल्या गोष्टी आपल्या पर्यंतच राहतात . पण आपल्याला बोलावंसं वाटत तेव्हा आपण नक्कीच बोल्ले पाहिजे . कदाचित आपल्या बोलण्याने समोरच्याला छान वाटेल , समोरच्याला त्यातून नवीन अनुभव आणि मार्ग मिळतील
अनुभव प्रत्येक प्रकारचे असतात कोणाला चांगल्या अनुभवातून वाईट गोष्टी समजतात तर कोणाला वाईट अनुभवातून चांगल्या गोष्टी शिकायला मिळतात आणि त्याच अनुभवातून माणूस पुढे जात असतो . आणि अश्या अनुभवांची शिदोरी प्रत्येकजन सोबत घेऊन जात असतो . आणि आपले अनुभव इतरांपर्यंत पोहचवत असतो. पण गोष्टी चांगल्या असुदे किंवा वाईट त्याचा अनुभव आल्याशिवाय माणूस पुढे जात नाही. तो रोज शिकतो शिकवतो आणि अनुभव घेत जातो. अनुभव हा शब्द जरी छोटा असला तरी परिणाम मात्र खूप मोठा देऊन जातो .
तसाच माझा आजचा अनुभव खूप छान वाटला मला ..... खरच खूप खूप thank you माझे ब्लॉग तुम्हाला आवडतात आणि तुम्ही त्याची वाट बघता ..... thank so much guys 😉😊💗😘
माझा आजचा ब्लॉग आणि अनुभव तुम्हाला आवडला असेल तर नक्की share करा आणि comment करा ....
Thank You

👍
उत्तर द्याहटवा