Marathi people and their thoughts | Rutu says
मराठी लोक आणि त्यांचे विचार ...
खरतर लोक सगळे एकच असतात . हा पण त्यांची विचार करण्याची पद्धत मात्र वेगवेगळी असते . कोणी छोट्या छोट्या गोष्टींवर रागवत तर कोणाला छोट्या छोट्या गोष्टींचा आनंद घेयला आवडतो . हा तर आपला विषय मराठी लोक ... 😁😀💖
असं म्हणतात मराठी भाषा आपल्याला आपण हवी तशी बोलू शकतो . त्या भाषेला आपण हवे तसे वळण देऊ शकतो . पण समोरच्या ऐकणाऱ्या व्यक्तीवर अवलंबून असते तो नक्की कोणता अर्थ घेतो . प्रत्येकजण आपल्या सोयीनुसार वेळकाढून प्रत्येक गोष्टीला वेळ देत असतो . कोणाला वेळेचे बंधन तर कोणाला वेळ जात नाही म्हणून लागलेलं ग्रहण .
मराठी भाषेतून निर्माण होणारे विचार आणि त्यातून प्रवृत्त होणारे लोक मात्र स्वावलंबी असतात . त्यांच्या प्रत्येक कामाच्या वेळा ठरलेल्या असतात . कोणत्या गोष्टीला किती वेळ देयचा हे काटेकोर पद्दतीने ठरवतात . एखादी गोष्ट चुकीची असली तर ती चूक पटवून देणं हे मराठी माणसाकडून शिकावं . मग ती भाषेच्या कोणत्याही वळणातून का असेना . पण ती पटवून दिल्या शिवाय का मागे हाटेल ... 😄😄💪 हा पण एखादी व्यक्ती किंवा गोष्ट बरोबर असेल आणि आपण चुकलो किंवा हि आपण केलेली गोष्ट चुकीची आहे हे मान्य करण्याची प्रवृत्ती आणि प्रामाणिकपणा मराठी भाषेत आणि माणसात आहे .
मराठी भाषा आणि लोक तेच जिथे स्त्रीचा आदर केला जातो . मराठी भाषा आणि लोक तेच जिथे वृद्धांना आधार दिला जातो . मराठी भाषा आणि लोक तेच जिथे संस्कृती जपली जाते..
बरोबर ना ..!? मग बोलूया मराठी आणि वागूया मराठी बघू आजून किती वळवता येते आणि कूठपर्यंत त्यांचे विचार पोहचवता येतायत . मी तर माझे विचार तुमच्या पर्यंत पोहचवले , आवडले तर नक्की तुमच्या मित्र मैत्रिणी आणि कुटुंब पर्यंत पोहचवा आणि तुम्ही तुमचे विचार नक्की कळवा . Thank you .. नाही नाही 😜
धन्यवाद ..... !!!!! 💝💙💚💛💜🙏
Nice writing 🤞 🤗 ✍
उत्तर द्याहटवाMst rutu🤗
उत्तर द्याहटवाThank u anku
उत्तर द्याहटवा