Everything you love feels overwhelming.| Rutu says
भारी भारी वाटणारी गोष्ट ( व्यक्ती )...
आपल्याला आवडणारी कोणतीही गोष्ट असुदे किंवा व्यक्ती असुदे किंवा वस्तू असुदे हि आपल्याला भारीच वाटते . आणि ती गोष्ट किंवा व्यक्ती किती भारी आहे हे आपण समोरच्याला तितक्याच चांगल्या प्रकारे पटवून पण देतो . आणि समजून पण सांगतो . मग आपण असा विचार नाही करत ती गोष्ट समोरच्याला आवडतेय का ? पटतेय का ? आपण फक्त आपल्याला आवडणाऱ्या गोष्टीचा किंवा व्यक्तीचा विचार करतो . आणि ती किती चांगली आहे याचाच विचार करत असतो. म्हणजे आपण नाणं बघतो , पण त्याची एकच बाजू बघतो . दुसरी बाजू बघायची तर लांब , पण आपण ती पलटून हि पाहत नाही . किंवा दुसरी बाजू असेल याचा विचार हि करत नाही .
कधी कधी आपल्याला आवडणारी गोष्ट किंवा व्यक्ती चांगली असते . तिच्या दोन्ही बाजू एकदम छान आणि समोरच्याला पटणाऱ्या देखील असतात. आपल्याला पण ती गोष्ट किंवा व्यक्ती आयुष्यभर साथ देते . पण कधी कधी आपण एकादी गोष्ट बघायला किंवा ओळखायला चुकीचे ठरतो . त्यावेळी ती गोष्ट किंवा व्यक्ती आपल्याला भारी वाटते . आणि आपण हट्टाने समोरच्याला पण पटवून हि देतो . समोरचा कितीही ओरडून सांगत असला कि ती गोष्ट चुकीची आहे , ती व्यक्ती खोटी आहे तरीही समोरच्याची हाक आपल्या पर्यंत पोहचत नाही . उलट आपणच दुर्लक्ष करून समोरच्याला नजरेआड करतो . आणि आपल्याला वाटत असणारी भारी गोष्ट किंवा व्यक्ती तिला आपलस करतो आणि तिची एकच बाजू आपण लक्षात घेतो . पण जेव्हा तीच गोष्ट किंवा व्यक्ती चुकीचा सल्ला देते किंवा आपल्यासाठी धोकादायक ठरते तेव्हा आपली वेळ तर निघून जातेच , पण समोरची चांगलं सांगणारी व्यक्ती सुद्धा आपल्या पासून लांब जाते.
आणि तेव्हा आपल्याला समजते आपल्याला आवडणारी प्रत्येक गोष्ट किंवा व्यक्ती हि भारी नसते ..!मग तुम्हाला आवडलेली गोष्ट किंवा व्यक्ती बघा भारी भारी आहे कि नाही ??!
सोबतच माझी पोस्ट तुम्हाला भारी वाटली तर नक्की share करा comment करा
Thank You
Nice
उत्तर द्याहटवाthank you
उत्तर द्याहटवा