Your Thoughts And The Joy of The Front | Rutu Says

 



                             

                                                    विचार आणि आनंद  ... 



           कोणतीही गोष्ट करायची म्हणली तर आपण आधी विचार करतो . कधी विचार पटला किंवा चांगला वाटला तर ती गोष्ट आपण पटकन करून टाकतो पण एकादी गोष्ट जर करायची असेल आणि ती पटत नसेल विचार केला तर चांगली वाटत नसेल तर आपण  खूप वेळ , कधी कधी खूप दिवस विचार करतो. आपल्याला ती गोष्ट करायची तर असते पण पटत नसते. कारण ती गोष्ट आपल्याला आपल्या पुरतीच योग्य वाटते . आपण जर ती गोष्ट केली तर आपल्या सभोवताली असलेले लोक त्यांना काय वाटेल याचा विचार आपण करतो आणि त्यांना ती गोष्ट कशी पटवून देयची याचाही विचार आपल्या मनात चालू ठेवतो . 

      खरतर आपण आपल्या कोणत्याच मतांचा किंवा कोणत्या विचारांचा कोणावरच जबरदस्ती नाही करू शकत . कारण प्रत्येकाचे विचार आणि त्यांचे मत आपल्या बद्दल आणि इतरांबद्दल हे वेगळे असतात . कधी स्वतःला चांगलं वाटत म्हणून नाही तर समोरच्याला चांगलं वाटत म्हणून जगावं लागत . कधी कधी समोरच्याचा आनंदातला वाटा आपल्याला घ्यावा लागतो . आपल्यालाही त्याच्या आनंदात आनंदी व्हावं लागत . खरतर आपल्याला स्वतःच्या आनंदात आनंदी होणापेक्षा  कधीतरी दुसऱ्याच्या आनंदात आनंदी होणं हे  मनाला वेगळा स्पर्श आणि छान शिकवण देऊन जात. मग काय हरकत आहे कधीतरी आपल्या आजूबाजूच्या लोकांच्या विचारांचा विचार करून जगायला . 

          काय हरकत आहे आपल्याला एखादी गोष्ट पटत असलेली पण समोरच्याच्या  विचारत बसत नसेल आणि त्याच्या आनंदासाठी न केलेली त्याला सुद्धा आनंद देते आणि त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून आपल्यालाही आनंद देते .  मग बघा तरी समोरच्याचा आनंदाचा वाटा घ्यायला त्याच्या आनंदात सहभागी व्हायला जमतंय का ??? . 



तुम्हाला जर हि पोस्ट आवडली तर नक्की share करा आणि comment करा . 

 


टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आयुष्य आहे चालायच च ! | Journey of life | Part2| Rutu says

Ganpati Bappa Morya | Pudhchya Varshi Lavkar Ya | rutu says

Challenging tomorrow morning | rutu says