Be Uniquely You Stand Out Shine Be Colorful | Rutu says
आपण आणि आपले रंगीन आयुष्य ..!
वेगवेगळ्या रंगापासून बनवलेल्या वस्तू आणि गोष्टी किती रंगीन आणि आकर्षक वाटतात ना . डोळ्यांना अगदी मोहून टाकतात . मनाला हवेहवेसे वाटतात . आपल्या आयुष्याचं पण तसेच आहे . आयुष्यात वेगवेगळ्या प्रकारचे रंग हे वेगवेगळ्या प्रकारची माणसे आणतात . काही माणसे आपल्याला दाखवताना एक आणि ते स्वताः असतात एक म्हणजेच आपल्या बोली भाषेत रंग बदलणारी असतात जे कि कोणाला आपलेसे वाटत नाहीत . आणि काही माणसे माझ्या आवडत्या रंगाप्रमाणे असतात म्हणजेच काळ्या रंगाप्रमाणे जे कधी बदलत नाहीत . कोणताही रंग मिसळला तरी आपला रंग सोडत नाही . रंगवणारी माणसे भरपूर आहेत आपण ठरवायचे आपल्याला कोणत्या रंगात मिसळायचे . कि आपणच आपला रंग निर्माण करायचा ...
मी वरवरच्या रंगांबद्दल नाही बोलते . जे आपल्या डोळ्यांना दिसतात . मी अंतरंगाबद्दल बोलते. जो रंग लोक लपवून ठेवतात . आणि जस जशी वेळ येईल तस तसे ते आपले रंग दाखवायला सुरु करतात आणि ते बदलत जातात . कस असत ना माणसाचं आयुष्य . आयुष्यात प्रत्येक गोष्ट हि त्याला रंगीन हवी असते . पण स्वतः मात्र त्यासाठी कधीही प्रयत्न सुद्धा करणार नाही . नेहमी दुसऱ्यांकडून अपेक्षा ठेवणार आणि अपेक्षा पूर्ण झाले नाही म्हणून त्या व्यक्तीला बोलत बसणार . आधी गोड गोड बोलणार मग आपले काम होत नाही समजल्यावर आपले रंग दाखवायला सुरु करणार .
आपले आयुष्य आपणच रंगीन करू शकतो हे का नाही समजत लोकांना . महत्वाची गोष्ट अपेक्षा नेहमी स्वतः कडून ठेवा . ज्या पूर्ण झाल्या नाही म्हणून चिडचिड होणार नाही आणि खोट खोट गोड गोड पण बोलाव लागणार नाही . आणि अपेक्षा पूर्ण झाल्या तर दुसऱ्यावर अवलंबून राहिलो नाही म्हणून कधी खंत सुद्धा वाटणार नाही. काय पटतंय ना ..! आपल्यातले आणि आपल्या आजूबाजूचे असणारे रंग आठवतायत ना ..? आपले आयुष्य आपल्या हातात आहे जे आपण रंगीन करू शकतो समोरची व्यक्ती नाही .
Awesome. This is so relatable 👍👍
उत्तर द्याहटवाnice post
उत्तर द्याहटवाNce
उत्तर द्याहटवाNice Rutu 👍
उत्तर द्याहटवाही टिप्पणी लेखकाना हलविली आहे.
उत्तर द्याहटवा