Habitude | rutu says





                                                                      सवय..!   



        अस म्हणतात एखाद्याची सवय लागली कि पटकन सुटत नाही . माणसाने नशा करावी पण कोणाची सवय लावून घेऊ नये . कारण लागलेली सवय हि एखाद्या नशे पेक्षा सुद्धा माणसाला कमजोर आणि एकट एकट बनवते . 

पण  मला असं वाटत जर एखाद्याची सवय लागत असेल किंवा सवय लागलेली असेल तर ती फक्त आपल्यालाच  असून किंवा आपल्या पूर्ती असून काय उपयोगाची ??? आपल्याला एखाद्या व्यक्तीची सवय लागत असेल तर ती समोरच्या व्यक्तीलाही तशीच लागायला हवी . आणि जर तस होत नसेल तर  समजून जा कि लागलेली सवय आपली तर कधीच नाही बदलणार.  पण समोरच्या व्यक्तीला लागलेली सवय कधीच बदलीये . त्या व्यक्तीला त्याच्याच सारख्या बदलणाऱ्या दुसऱ्या व्यक्तीची सवय लागलेय . 

खूप त्रास होतो ना .!? जेव्हा आपल्याला समजत कि आपल्याला लागलेली एखाद्या व्यक्तीची सवय हि कधी सुटणार नाही  आणि ती सवय आपण कधीच विसरू शकत नाही , पण त्या व्यक्तीला त्याची जरा सुद्धा भनक लागत नाही . आणि ती व्यक्ती तिच्या पद्धती नुसार तिच्या सवयी बदलत राहते . 

म्हणून मला असं वाटत कि सवयी दोन प्रकारच्या आहेत . एक नशा न करता व्यसनाधीन झालेली सवय आणि दुसरी बदलत्या मोसम सारखी नेहमी बदलत गेलेली सवय ... मग तुम्हाला झालीयेका अशी व्यसनाधीन सवय कि तुम्ही पण बदलत्या मोसम सारख्या सवयी बदलत गेलाय . 😌😌

                                            

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आयुष्य आहे चालायच च ! | Journey of life | Part2| Rutu says

Ganpati Bappa Morya | Pudhchya Varshi Lavkar Ya | rutu says

Challenging tomorrow morning | rutu says