What will people say? | Rutu Says
ते चार लोक काय म्हणतील ..?!
कस असत ना आपलं आयुष्य .. हे खरच आपले आयुष्य , हे आपले आहे का .?! हा प्रश्न कधी स्वतःला विचारलाय का ?
आपलं आयुष्य आपण जगत तर असतो पण आपल्या मनासारखं कमी आणि दुसऱ्याच्या मनासारखं जास्त जगत असतो. म्हणजेच आपल्या विचारांवर किंवा हालचालींवर समोरची व्यक्ती काय म्हणेल किंवा आपल्या आजूबाजूचे चार लोक काय म्हणतील ह्याचा विचार आपण जास्त करतो . आणि यातच आपण आपले आक्खे आयुष्य घालवतो . का नाही आपण आपले आयुष्य स्वतःच्या मनासारखं जगू शकत ? का नेहमी आपण आपला विचार करताना त्या चार लोकांचा विचार मनामध्ये आणतो ? मुळातच ते चार लोक आपलं चांगले झाले तरी आपला द्वेष करत असतील आणि आपले वाईट झाले तरी आपली टीका करत असतील , तर का विचार करायचा त्या चार लोकांचा ..?!
हा मान्य आहे आपण समाजात राहतो . त्या समाजाच्या काही चाली रीती आहेत आणि आपण त्या नुसार नक्कीच वागले पाहिजे . पण कुठे तरी आपण त्या चार लोकांच्या विचारांमध्ये , मतांमध्ये स्वतःला इतके अडकवून घेतो कि आपल्याला कळत सुद्धा नाही कि आपण आपल्याच आयुष्य बद्द्दल समोरच्यावर अवलंबून आहोत .
आपण नेहमी म्हणतो आपण समाजासाठी जगायला पाहिजे पण इथे जर आपणच आपल्या साठी नीट जगत नाहीये ,आपण आपलाच विचार नीट करू शकत नाहीये , तर आपण समाजासाठी काय विचार करणारे ...!!!???
त्यामुळे आधी स्वतः साठी जगायला शिका , स्वतःच्या मतांवर ठाम राहा तर तुम्ही समाज घडवू शकाल . दुसऱ्यांच्या मतांवर आणि त्याच्या विचारांवर कधीच विश्वास ठेवू नका . कारण आपलं आयुष्य आपण घडवतो ते चार लोक नाहीत ... !!!
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा