The Next Morning is Good | rutu says
चार ऑपशन्स आणि सबमिट बटन . . .
परीक्षा झाल्या नंतरची सकाळ किती छान आणि आनंदी वाटायची ना ..? अभ्यासाचं ओझ डोक्यावरून खाली घेतल्या सारखे वाटायचे . पण आता तस काहीच वाटत नाही . आयुष्या मध्ये नवीन करण्याची इच्छा तर होत नाहीच , पण जे आहे ते सुद्धा आवडीने करावेसे वाटत नाही . आवडीने म्हण्यापेक्षा प्रत्येक गोष्ट समोर आलीये आणि ती करावी लागणारे , म्हणून करावी लागतेय . आणि ती गोष्ट मनासारखी नाही झाली , कि मग असं होत ना कि झालीये ना आता ती गोष्ट , परत कशाला त्यावर चर्चा असं म्हणून आपल्याला सोडून दयावी लागते .
आजकालच्या परीक्षेत जसे ऑपशन आलेत ना तसेच आयुष्य पण आता ऑपशन वर अवलंबून राहिलंय , मला हे करायचंय ,मला इकडे जायचंय , मला असं करून दाखवायचय , माझं हे स्वप्न आहे , मला हे घेयचय .. असा आयुष्याचा भला मोठा समास आता चार ऑपशन वर अवलंबून राहिलाय . एक ऑपशन निवडायचा आणि सबमिट करायचं .
एखादी नवीन गोष्ट करताना जी मनात भीती असायची , कि मला हि नवीन गोष्ट जमेल का ..? ती भीती आता कमी झालीये . इंटरनेट ने तर आता सगळे सोपे करून दिलेचे . त्यामुळे प्रत्येकाला प्रत्येक गोष्ट थोडीका होईना पण माहिती झालीये . आधी कोणतीही नवीन गोष्ट करताना आपापसात जी चर्चा होयची ती आता कमी होईला लागलीये . आता प्रत्येक नवीन प्रश्नांची उत्तरे .. हा हे ना .. हे मला माहितीये ..! या उत्तरावर अवलंबून राहिलय .
पण हे जर असेच चालत राहिले तर , आपण परीक्षा झाल्या नंतरची जी आनंदी सकाळ पाहिली आणि अनुभवली ती पुन्हा इतरांना अनुभवायला मिळेल का ..?
का आता प्रत्येकाचं आयुष्य चार ऑपशनवर आणि एका सबमिट बटनावर अवलंबून राहणारे ..!? 😕😑
आवडले तर नक्की share करा आणि comment करा .. ✌🙏 तुमचे हि असेच छान अनुभव असतील किंवा तुमच्या मनातल्या गोष्टी असतील ज्या तुम्हाला इतरांपुढे मांडायच्या आहेत तर मला नक्की comment मध्ये कळवा . मी तुमच्या अनुभवाला माझ्या शब्दांची जोड देऊन तुमच्या पर्यंत पोहचवण्याचा नक्की पर्यंत करेन ✌😊

Chaan👌
उत्तर द्याहटवाThank You
उत्तर द्याहटवा