The Next Morning is Good | rutu says

                                                          




                                चार ऑपशन्स आणि सबमिट बटन . . .  






                      परीक्षा झाल्या नंतरची सकाळ किती छान आणि आनंदी वाटायची ना ..? अभ्यासाचं ओझ डोक्यावरून खाली घेतल्या सारखे वाटायचे . पण आता तस काहीच वाटत नाही . आयुष्या मध्ये नवीन करण्याची इच्छा तर होत नाहीच , पण जे आहे ते सुद्धा आवडीने करावेसे वाटत नाही . आवडीने म्हण्यापेक्षा प्रत्येक गोष्ट समोर आलीये आणि ती करावी लागणारे , म्हणून करावी लागतेय . आणि ती गोष्ट मनासारखी नाही झाली , कि मग असं होत ना कि झालीये ना आता ती गोष्ट , परत कशाला त्यावर चर्चा असं म्हणून आपल्याला सोडून दयावी लागते  . 
                       आजकालच्या परीक्षेत जसे ऑपशन आलेत ना तसेच आयुष्य पण आता ऑपशन वर अवलंबून राहिलंय , मला हे करायचंय ,मला इकडे जायचंय , मला असं करून दाखवायचय , माझं हे स्वप्न आहे , मला हे घेयचय ..  असा आयुष्याचा भला मोठा समास आता चार ऑपशन वर अवलंबून राहिलाय . एक ऑपशन  निवडायचा आणि सबमिट करायचं . 
                        एखादी नवीन गोष्ट करताना जी मनात भीती असायची , कि मला हि नवीन गोष्ट जमेल का ..? ती भीती आता कमी झालीये  . इंटरनेट  ने तर आता सगळे सोपे करून दिलेचे . त्यामुळे प्रत्येकाला प्रत्येक गोष्ट थोडीका होईना पण माहिती झालीये . आधी कोणतीही नवीन गोष्ट करताना आपापसात जी चर्चा होयची ती आता कमी होईला लागलीये . आता प्रत्येक नवीन प्रश्नांची उत्तरे .. हा हे ना .. हे मला माहितीये ..!  या उत्तरावर अवलंबून राहिलय . 
                        पण हे जर असेच चालत राहिले तर , आपण परीक्षा झाल्या नंतरची जी आनंदी सकाळ पाहिली आणि अनुभवली ती पुन्हा इतरांना अनुभवायला मिळेल का ..?  
                        का आता प्रत्येकाचं आयुष्य चार ऑपशनवर आणि एका सबमिट बटनावर अवलंबून राहणारे ..!? 😕😑






                        आवडले तर नक्की share करा आणि comment करा .. ✌🙏 तुमचे हि असेच छान अनुभव असतील किंवा तुमच्या मनातल्या गोष्टी असतील ज्या तुम्हाला इतरांपुढे मांडायच्या आहेत  तर मला नक्की comment मध्ये कळवा  . मी  तुमच्या अनुभवाला माझ्या शब्दांची जोड देऊन तुमच्या पर्यंत पोहचवण्याचा नक्की पर्यंत करेन ✌😊

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आयुष्य आहे चालायच च ! | Journey of life | Part2| Rutu says

Ganpati Bappa Morya | Pudhchya Varshi Lavkar Ya | rutu says

Challenging tomorrow morning | rutu says